बुधवार पेठेतल्या 'त्या' गल्ल्या पडल्या ओस पण, 'त्यांना' पुण्यात परत यायचे... 

Woman Work at red light area in pune want to return from village
Woman Work at red light area in pune want to return from village

पुणे : 'कोरोना'मुळे बुधवार पेठ बंद झाली अन् त्या गावाकडे निघून गेल्या, आता एक दीड महिना झाला, घरी बसून आहेत. कामधंदा नाही, पैसा नाही, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवतोय. पैसे कमविण्यासाठी पुन्हा पुण्यात यायचे आहे, फोन करून इथल्या महिलांना त्या 'सगळे सुरळीत झाले का?" असे त्या विचारत आहेत. पण बुधवार पेठेकडे एकही ग्राहक फिरकत नसल्याने ऐकताच पुण्यात यायचा विचार बदलत आहेत. ही अवस्था आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पुण्यातील बुधवार पेठेत सुमारे २ हजार वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत. 'कोरोना' मुळे लाॅकडाऊन झाले अन् गजबजलेल्या पेठेतील गल्ल्या ओस पडल्या. सोशल डिस्टन्स ठेवला तरच 'कोरोना'वर प्रतिबंध होऊ शकतो, असे असताना या व्यवसायात शारिरीक स्पर्श आहे. त्यामुळे जिवाच्या भितीने महिलांनी काम बंद केले, तर ग्राहकांनीही पाठ फिरवली. 

होय, मला कोरोना झालाय. तुमच्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच बरा होईल! 

राज्य सरकारने परप्रांतीयांना प्रवास करण्याची परवानगी दिल्या नंतर बुधवार पेठेतील कर्नाटक आणि पश्चिम बंगाल मधील सुमारे १५० महिला पुणे सोडून गावाकडे गेल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील महिलांची उपासमार होत असताना सामाजिक संस्था, पोलिसांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या, अजून ही मदत सुरू आहेतच. पण या महिलांकडील पैसे संपले आहेत. बुधवार पेठे पुन्हा कधी गजबजले हे सांगता येत नाही. यामुळे या महिला चिंतेत पडल्या आहेत. त्यामुळे गावाकडे गेलेल्या महिलांना त्या तुम्ही तिकडेच रहा, इकडे येऊन काहीही उपयोग नाही असे सांगत आहेत. मात्र, गावाकडे गेलेल्या महिलांना तेथेही काहीच काम नसल्याने त्याही तणावाखाली आहेत. 
बुधवार पेठेतील महिलांसाठी काम करणाऱ्या सहेली संस्थेच्या कार्यकारी संचालिका

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, "दीड महिन्यापूर्वी सुमारे १५० महिला कर्नाटक आणि कोलकत्ता येथे स्वतःच्या घरी गेल्या. आता कोणीही गावाकडे जात नाही. ज्या महिला गावाकडे गेल्या आहेत, त्यांना परत पुण्यात यायचे असल्याने चौकशी करत आहेत. पण भिती मुळे महिला पुन्हा व्यवसाय सुरू करायला तयार नाहीत. या महिलांकडील पैसे संपत आले आहेत, सामजिक संस्था मदत करत असल्या तरी त्यांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे या महिलांना काही महिने तरी केंद्र सरकारने भत्ता दिला पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर आम्ही पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू केला आहे.सरकारने या समस्येने लक्ष दिले पाहिजे. 

फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com