धामारी-केंदूर रस्त्यावर अपघातात विवाहिता जखमी

भरत पचंगे
बुधवार, 4 जुलै 2018

शिक्रापूर (पुणे): धामारी-केंदूर रस्त्यावरील धोक्‍याच्या वळणाची दुरुस्ती करा, अशी गेल्या काही वर्षांपासून मागणीची कुणीच दखल घेत नसल्याचा फटका शुभांगी गणेश डेरे या विवाहितेला बसला. येथील अपघातात तिचे हात आणि पाय फ्रॅक्‍चर झाले आहेत. याबाबत राजकीय अनास्था आणि बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असे दोन्ही घटक जबाबदार आहेत.

केंदूर ते धामारी या रस्त्यावर असलेल्या वेळ नदीच्या पात्राच्या चढावर धोकादायक वळण आहे. तिथे नियमित छोटे-मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी चार वर्षांपूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हे वळण कमी करावे किंवा काढून टाकावे, अशी मागणी धामारी, केंदूर व महादेववाडीतील तरुण नियमित करीत असतात. मात्र याबाबत कुणीच गांभीर्याने घेत नसल्याचा फटका नुकताच शुभांगी डेरे या विविहितेला बसला.

या वळणावरून दुचाकीवरून जाताना ती घसरली व तिच्या डोक्‍यासह हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने मेंदूला मोठी इजा झाली नाही. याबाबत तातडीने दखल घेऊन या रस्त्याचे धोकादायक वळण कमी करण्याची मागणी गणेश डेरे, माजी सरपंच संपत कापरे आदींनी केली.

Web Title: women accident in dhamari kendur road