बहुजन समाजातील महिला व युवकांनी उदयोगाकडे वळावे - वाघमारे

प्रा. प्रशांत चवरे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

भिगवण - व्यवसाय व उदयोगाच्या माध्यमातून महिला व युवकासमोर प्रगतीच्या चांगल्या संधी आहेत. बहुजन समाजातील महिला व युवकांसाठी शासनाच्या विविध महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन महिला व युवकांनी उदयोगाकडे वळावे असे आवाहन आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष तथा रोजगार व उदयोग योजनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.

येथील बौध्द विहारांमध्ये महाराष्ट्र राज्य रोजगार उदयोग निर्माण समितीच्या वतीने महिला व युवक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आर.पी.आयचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार, शिवाजी मखरे, राणी धवडे, मंदा चव्हाण, सविता कांबळे, सुनिल शिंदे, आशा मोहिते, बाळासाहेब जाधव, संतोष चव्हाण, विनायक लोंढे, उपस्थित होते. 

वाघमारे पुढे म्हणाले, की सध्या शासनाच्या माध्यमातून महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ या साऱख्या महामंडळाच्या माध्यमातून बहुजन समाजातील महिला व युवकांनी सहकार्य करण्यात येत आहेत त्याचा उपयोग करुन घेतला पाहिजे. 

यावेळी शिवाजी मखरे, जयश्री जाधव व इंदुमती जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विक्रम शेलार यांनी केले, सुत्रसंचालन अमोल कांबळे यांनी केले तर आभार रोहित शेलार यांनी मानले.

Web Title: Women and youth Employment rally