कापडी पिशवीमधून महिलांच्या हाती पैशांचा खळखळाट

कापडी पिशवीमधून महिलांच्या हाती पैशांचा खळखळाट

वालचंदनगर : सणसर (ता. इंदापूर) येथील मयुरेश्‍वर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आंध्र प्रदेशामधील कलमकारी कापडापासून पिशवी (बॅग) निर्मितीला सुरवात केली असून, घरबसल्या दहा महिलांना रोजगारीची संधी मिळाली आहे. यामुळे महिलांच्या हाती आता पैसा खळखळू लागला आहे. 

वाढल्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस प्लॉस्टिकची कॅरीबॅग वापरावरती र्निबंध येवू लागले आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होवू लागला असून, महिलांना घरगुती काम करीत रोजगाराची संधी सहज उपलब्ध होवू लागली आहे.

सणसरमधील कल्पना धोत्रे या महिलेने तीन वर्षापूर्वी गावतील दहा महिलांना एकत्र घेवून मयुरेश्‍वर बचत गट सुरु केला. महिलांना घरातील कपड्यापासून पिशव्या बनविण्यास सुरवात केली.मात्र उत्पादन केलेल्या मालाची विक्री करण्याचा अनुभव नसल्याने पिशव्यांचा व्यवसाय गावापुरताच मर्यादित राहिला. बारामतीमधील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या माध्यमातून विश्‍वस्त सुंनदा पवार व समन्यवक बाळासाहेब नगरे यांनी महिलांना मार्गदर्शन करुन व्यवसायिक विविध प्रकाराच्या पिशव्यांची निर्मिती करण्यासाठी प्राेत्साहन दिले.

गेल्या दोन -अडीच वर्षापासून सणसरच्या महिलांनी बनविलेल्या पिशव्यांनी भीमथडी जत्रा, धान्य महोत्सव व कृषी प्रर्दशनामध्ये भरारी घेतली. तसेच मंत्रालयापर्यंत ही बॅघा पोहचल्या असून काही बॅगा परदेशापर्यंत गेल्या आहेत. शारदानगरमध्ये विविध प्रकाराचे स्टॉल लावण्याची संधी दिल्यामुळे बॅगा व इतर वस्तुंची  विक्री विक्रमी होत आहे. सध्या धाेत्रे यांच्यासह गावातील महिलांना पत्र्याची शेडमध्ये आंधप्रदेशातील कलमकारी कापडापासुन बॅगची निर्मिती करीत आहेत. तसेच गावातील काही महिला शेतातील काम, घरचे काम उरकून दररोज ८ ते १० बॅग घरबसल्या शिवत असून त्यांना दिवसाला ४०० ते ५०० रुपये मिळत आहेत.

महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न...
ग्रामीण भागातील महिलांकडे पडेल  ते काम करण्याची ताकद आहे. महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या  आंधप्रदेशातील कलमकारी कापडाच्या विविध बॅगला मोठ्या प्रमाणात मागणी असून महिलांनी बॅगची निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन बारामतीच्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट विश्‍वस्त सुनंदा पवार यांनी केले.

घरबसल्या पैसे मिळत आहे...
मी गृहणी असून घरातील व  जनावरांचे काम पाहून दुपारी व संध्याकाळच्या वेळेमध्ये सात ते आठ बॅगा शिवत असून मला ३५०ते ४०० रुपये सहज मिळत असल्याचे विजया काटकर यांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com