स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी पुढाकार घ्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

तळेगाव ढमढेरे - ‘अलीकडील काळात भोगवादी वृत्तीमुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खालावत चालला आहे. चंगळवादामुळे समाजात स्वैराचार निर्माण झाला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,’’ असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. मंदा खांडगे यांनी व्यक्त केले. 

तळेगाव ढमढेरे - ‘अलीकडील काळात भोगवादी वृत्तीमुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खालावत चालला आहे. चंगळवादामुळे समाजात स्वैराचार निर्माण झाला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,’’ असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. मंदा खांडगे यांनी व्यक्त केले. 

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महागणपती मंदिरात शुक्रवारी अखिल भारतीय तेराव्या स्त्री साहित्य-कला संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी खांडगे बोलत होत्या. स्वानंद महिला संस्था, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला शाखा व आराध्य फाउंडेशन यांच्यातर्फे अखिल भारतीय स्त्री साहित्य-कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘समाज घडण्यासाठी महिलांचा मोठा वाटा असून, स्त्री शिक्षणामुळे समाजाचे चित्र बदलले आहे. महिलांवरील अत्याचार हा सामाजिक कलंक असून, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजाने स्वीकारली पाहिजे.’’  संमेलनाच्या स्वागताध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी स्वर्गीय चंदनमल दर्डा यांच्या स्मरणार्थ महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगाव गणपती, शिरूर नगरपालिका, फियाट इंडिया कंपनी, स्वोरोस्की कंपनी, जाबिल कंपनी व मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी रुचिरा सुराणा, उद्योजक प्रकाश धारिवाल, प्रमिला सांकला, डॉ. विश्वास मेहेंदळे, सभापती सुभाष उमाप, मानसिंग पाचुंदकर, शेखर पाचुंदकर, सविता बगाटे, कुसुम मांढरे, वैशाली वाखारे, विश्वास कोहकडे, सरपंच मनीषा लांडे, अशोक पगारिया, कांतिलाल बोथऱा, सुरेखा पुणेकर, रंजना लोढा, मोहनलाल चोपडा, उद्धव कानडे उपस्थित होते. स्वाती पाचुंदकर, सुरेखा कटारिया, वर्षा टाटीया, पुष्पा ओसवाल, कल्पना कर्नावट यांनी संयोजन केले. सारिका पाचुंदकर यांनी आभार मानले. 

विश्‍वस्त गैरहजर
संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे एकही विश्वस्त उपस्थित नव्हते. देवस्थानच्या विकासाच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील यांना विश्वस्तांशी चर्चा करायची होती; परंतु एकही विश्वस्त उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. संमेलनात ट्रस्टला पुरस्कार होता; परंतु हा पुरस्कार देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांनी स्वीकारला. यासंदर्भात विश्वस्तांशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: women atrocity restriction manda khandage