पुण्यात आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील अवैध दारू विक्रीचे व्यवसाय बंद व्हावेत, याबाबत वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पोलिस आयुक्तालयासमोर गुरुवारी दुपारी एक वाजता घडली. 

मोनिका राम मदने (वय 30, रा. तुकाईनगर, सिंहगड रस्ता परिसर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने या राहात असलेल्या ठिकाणी व सिंहगड रस्ता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचे व्यवसाय आहेत. संबंधित व्यवसाय बंद व्हावेत, यासाठी महिलेने पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतरही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे या महिलेने गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालय गाठले. पोलिस आयुक्तालयाच्या 3 क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. दरम्यान, त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले. 
 
Web Title: women attempt suicide in front of the commissioner office in Pune