पुणे : तपासणीच्या बहाण्याने स्पर्श केला; डॉक्‍टरला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी संबंधित डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुणे ः दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी संबंधित डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

डॉ.अमित गांधी (वय 40, रा. बदामी हौद चौक, शुक्रवार पेठ) असे या पोलिसांनी अटक केलेल्या संशयित डॉक्‍टरचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.गांधी याचा शुक्रवार पेठेमध्ये ओंकार क्‍लिनिक नावाचा दवाखाना आहे. तेथे फिर्यादी शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तपासणीसाठी गेल्या होत्या. फिर्यादी डॉक्‍टरच्या ओळखीच्या आहेत. दरम्यान, डॉ.गांधीने फिर्यादी यांच्या अंगातील ताप तपासणीचा बहाणा करुन त्यांच्या हाताच्या मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतच्या भागास स्पर्श केला. तसेच दवाखान्यात खासगी प्रश्‍न विचारल्याने तेथे उपस्थित अन्य व्यक्ती हसल्याने फिर्यादी यांना हा प्रकार लज्जास्पद वाटला.

फिर्यादी या मागासवर्गीय असल्याचे माहीत असल्यामुळे डॉ. गांधी याने हा प्रकार मुद्दाम केल्याचे त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध महिलेने विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर खडक पोलिसांनी डॉक्‍टरला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त प्रदीप आफळे अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Crime in pune Doctor arrested