पुण्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह; रुग्णवाहिका चालकांचा मृतदेह नेण्यास नकार | Women Death Body In Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Death Body

पुण्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह; रुग्णवाहिका चालकांचा मृतदेह नेण्यास नकार

किरकटवाडी: किरकटवाडी(ता.हवेली) येथे एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह (Death Body) आढळला आहे. चंद्रकला चंद्रकांत खेत्रे (वय 40, सध्या रा.किरकटवाडी मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव असून दहा दिवसांपूर्वी या महिलेने आत्महत्या (Suicide) केली असावी अशी प्राथमिक शक्यता हवेली पोलीसांनी व्यक्त केली आहे. (Women Death Body in Pune)

आज दि. 11 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास किरकटवाडील ओढ्यात खेकडे पकडणाऱ्या कातकरी समाजातील महिलांना सडलेला मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यानंतर हवेली पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार रामदास बाबर, सुभाष गिरे, दिनेश कोळेकर, पोलीस नाईक दिपक गायकवाड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा: ट्रान्सजेंडर कैद्यांसाठी केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाइन्स

पोलीसांनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलवली परंतु मृतदेह अत्यंत सडलेला असल्याने व दुर्गंधी येत असल्याने रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. शेवटी जागेवर शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ वंदना गवळी यांना बोलवण्यात आले. आरोग्य अधिकाऱ्यांनीही मृतदेहाचे विघटन झालेले असल्याने शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचे सांगितले. मृत महिलेचा पती, मुलगा व इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलेच्या घरच्यांची कोणतीही तक्रार नसल्याने त्यांच्याशी चर्चा करून पोलीसांनी जागेवरच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsdeathwomen body
loading image
go to top