महिला उपअभियंत्याला लाचप्रकरणी सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे -लोहगाव येथील हवाई दलाच्या गॅरिसन इंजिनिअरिंग कार्यालयातील महिला उपअभियंत्याला 90 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मिनू कमलेश गुप्ता (वय 50, रा. वडगाव शेरी) या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहायक अभियंता रोहिदास बलिराम आहेर (वय 50, रा. लोहगाव) यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठेकेदार जगदीश सचदेव यांनी तक्रार दिली होती. सीबीआयने लोहगाव येथे ऑक्‍टोबर 2016 मध्ये ही कारवाई केली होती. 

सचदेव यांचे सात लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आहेर व गुप्ता यांनी एक लाख 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात 90 हजार रुपयांवर तडजोड झाली. याबाबत सचदेव यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने गुप्ता हिला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. 

या खटल्याचे कामकाज सीबीआयचे विशेष सरकारी वकील मनोज चलाडन यांनी पाहिले. 

Web Title: Women Deputy Engineer imprisonment in Bribery Case

टॅग्स