भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg

पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर पडले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजता कोथरुड येथे घडली. 

सुरेखा प्रदीप वाणी (वय 55, रा.सिद्धीविनाय सोसायटी, गुरूगणेशनगर, कोथरुड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप दत्तात्रय वाणी (वय 64) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणी दाम्पत्य शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरुन कोथरुड येथील त्यांच्या घरी जात होते. ते चांदणी चौकातून पौड रस्त्याने कोथरुड डेपोच्या दिशेने तीव्र उतारावरुन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने एक दुचाकीस्वार भरधाव जात होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या व उजव्या बाजुने जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडले, त्यामध्ये सुरेखा वाणी यांच्या डोक्‍याला गंभीर जखमी दुखापत होऊन त्यांचा मृत्यु झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com