Vidhan Sabha 2019 : मतदानासाठी महिलांचा उत्‍साह

Women Voter
Women Voter

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होतो. मतदान हा केवळ हक्क नाही, तर ती आमची जबाबदारीदेखील आहे. ती पार पाडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच एका नागरिकाची जबाबदारी म्हणून आम्ही मतदान केले आहे, अशा शब्दांत महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

पुण्यात पावसाने आज सकाळपासूनच उघडीप दिल्याने मतदार सकाळपासून बाहेर निघाले. महिलांनीही लवकर मतदान करण्याची वेळ साधली. शहराच्या दक्षिण टोकाच्या आंबेगावपासून शहरातील शनिवार पेठेपर्यंत सर्वच ठिकाणी मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. शहरात शनिवार पेठेत अहल्यादेवी शाळेत महिलांसाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी असे कोणतेही केंद्र दिसून आले नाही.

अहल्यादेवी शाळेत मतदान केंद्रातील पोलिसांना याबाबत विचारले असता सकाळपासून या केंद्रावर महिला आणि पुरुष, असे संमिश्र मतदान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रासह इतर मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत मतदानासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर मात्र संख्या रोडावली, तशी महिलांची संख्याही कमी झाली. सायंकाळच्या सुमारास पुन्हा गर्दी वाढू  लागली होती. 

अलका कोठावळे म्हणाल्या, ‘‘मी सकाळी सात वाजता मतदान केले. त्या वेळी चांगली गर्दी होती. लोकांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून आला.’’ 

दुपारच्या वेळी मतदान करणाऱ्या विद्या थडानी यांनी गर्दी नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘मतदान हे आपल्या हक्काबरोबरच राष्ट्रीय कर्तव्यदेखील आहे. सर्वांना याचा विचार करून मतदान करायला हवे होते.’’

आपला नेता आपल्याला निवडायचा असतो. त्यामुळे मतदान हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. आज पाऊसही नव्हता आणि सरकारनेही सुटी जाहीर केली होती. यामुळे या मतदान केंद्रावर गर्दी आहे.
- ईश्‍वरी देशमुख, मतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com