#WomenSefty शहरात महिला, मुली सुरक्षित आहेत का...?

#WomenSefty शहरात महिला, मुली सुरक्षित आहेत का...?

एका श्‍वानाला अपघात झाला म्हणून त्याला मदत करण्यासाठी माझी मुलगी बाणेरला गेली होती. त्यानंतर दुचाकीवरून ती घरी परतत होती. मित्राची गाडी पुढे होती. कोणीतरी पाठलाग करीत आहे, असे तिला वाटले; म्हणून ती रस्त्यावर थांबली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने मित्राला फोन केला. दरम्यान, मोटारसायकलवरून दोन मुले तेथे आली. मदतीच्या बहाण्याने ते तिच्याशी लगट करू लागले. स्वरक्षणार्थ मुलीने एकाला कानशिलात मारली. त्यामुळे दुसऱ्या मुलाने तिचे केस धरून डोके दुचाकीच्या स्पिडोमीटरवर जोरात आपटले. मुलीच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. तिचा आरडाओरडा ऐकून मित्र तेथे पोचला. त्याने त्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही त्यांनी हल्ला केला. एकाने जवळची झाडाची कुंडी उचलून मुलीच्या डोक्‍यावर मारण्याचा प्रयत्न केला एकाने तिचा गळा दाबून धरला होता.

मुलीने चपळाईने त्या युवकांच्या मोटारसायकलची किल्ली काढून घेतली. त्यामुळे त्यांना पलायन करता येईना. त्यानंतर तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर २२-२५ मिनिटांनी गस्तीवरचे पोलिस तेथे पोचले. त्याच वेळी त्या युवकांनी त्यांच्या सात-आठ मित्रांना तिथे बोलावले. मात्र पोलिस दिसल्यावर त्यांना तेथे काही करता येईना. त्यानंतर पोलिसांनी युवकांना पोलिस ठाण्यात नेले. तेथे तक्रार नोंदवून घेताना समोरच आरोपी युवक बसले होते. त्यांच्यात हास्यविनोद सुरू होते. आम्ही लगेचच बाहेर येऊ, अशी धमकी ते पोलिसांसमोरच देत होते. पहाटे पाचला फिर्याद दाखल केली. त्याची प्रत सकाळी अकरा वाजता देऊ, असे पोलिसांनी सांगितले. आठ तासांनी मुलांना जामीनही मिळाला. गुन्ह्यात पोलिसांनी योग्य कलमांचा समावेश केला नाही. याबाबत पोलिस आयुक्तांना भेटलो.  काही स्वयंसेवी संस्थांनीही मदत केली. 

काही अनुत्तरित प्रश्‍न... 
घटनास्थळावर युवतीला मारहाण होऊन तिचा विनयभंग होत आहे, हे पोलिसांना कळवूनही महिला पोलिस घटनास्थळी का आली नाही?
नियंत्रण कक्षाला कळवूनही पोलिस २०-२५ मिनिटांनी घटनास्थळावर पोचले. दरम्यानच्या काळात काही जीवघेणे घडले असते, तर?
जीवघेणा हल्ला होऊनही गंभीर कलमांचा समावेश या गुन्ह्यात का झाला नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com