#PunePolice महिलांना नाहीये पोलिसांवर 'भरोसा' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

पुणे : पतीने कामगाराला घेऊन दिलेल्या गाडीचे पैसे मागणाऱ्या महिलेस कामगाराने धक्काबुक्की केली. तिचे कपडेही फाडले. यासंदर्भात उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बाळासह गेलेल्या महिलेस ताटकळत ठेवले. त्यानंतर तक्रार देऊ नये, असा सल्ला पोलिसांनी देत आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या घटनेत लष्करी जवानाच्या पत्नीला चौघांकडून मारून टाकण्याची धमकी देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. 

एकीकडे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून महिलांना "भरोसा' दिला जात असताना पोलिस ठाण्यांमध्ये मात्र महिलांची "हेळसांड' होत असल्याचे चित्र दिसत आहे. शीतल श्रेयस खटावकर (वय 28, रा. शिवणे) यांच्या पतीचा उत्तमनगरजवळील शिंदे पूल येथे "पायोमीअर फूड सर्व्हिसेस'चा व्यवसाय होता. त्यांच्याकडे अजितसिंग व संतकुमार सिंग हे सेल्समन म्हणून काम करत होते. काम सोपे होण्यासाठी खटावकर यांनी दोघांना दोन दुचाकी घेऊन दिल्या. व्यवसाय बंद पडल्यानंतर फिर्यादी गाडीचे पैसे घेण्यासाठी कामगारांच्या घरी गेल्या. त्या वेळी अजितसिंगने त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दरम्यान, पोलिसांनी तक्रार न देण्याचा सल्ला संबंधित महिलेला दिला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीत चुकीची माहिती लिहिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. 

पोलिस आरोपींना सहकार्य करत होते, तर आम्हाला आरोपींसारखी वागणूक दिली जात होती. महिलेच्या विनयभंगाचा प्रकार घडूनही पोलिस आरोपींना पाठीशी घालत होते. 

- डॉ. श्रीकांत खटावकर, फिर्यादी महिलेचे सासरे 

महिलांची प्रकरणे संवेदनशीलतेनेच हाताळली जातात. त्यादृष्टीने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन आरोपीला अटक केली. या प्रकरणाचे दोषारोपपत्रही आम्ही तत्काळ न्यायालयात सादर केले आहे. आरोपींना पोलिसांनी सहकार्य करण्याचा प्रश्‍नच येत नाही. 
- अनघा देशपांडे, पोलिस निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे 

संबंधित प्रकरणाबाबत माझ्याकडे अद्याप तक्रार अर्ज आलेला नाही. अर्ज आल्यानंतर चौकशी करू. पोलिस दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

- मंगेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ 3 

महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यास आम्हाला कळवा... 

Web Title: Women has not Trust on Police