जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्यात महिला जखमी

राग जगताप
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले.

सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन गावातून घरी फुलसुंदरमळ्यात चालल्या होत्या. गणपती मंदिराजवळ कालव्याच्या बाजुला बिबट्यानेे अचानक त्यांच्या दुचाकिवर हल्ला केला आणि त्यात सुरेखा बनकर जखमी झाल्या. हल्ला केल्या नंतर ही बिबट्याने त्यांचा काही अंतर पाठलाग केला.

त्यानंतर त्याना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटना माजी सरपंच संतोष कदम याना समजल्यावर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर ओतूर वनविभागाचे वनपाल विशाल अडगळे व वनरक्षक एस ऐ राठोड आणि ओझर विभागाच्या वनरक्षक कांचन ढोमसेे यांनी जखमी महिलेची भेट घेतली. तसेच अडगळे व राठोड यांनी बिबट्याचा हल्ला झालेल्या ठिकाणी रात्री भेट देवुन ग्रामस्थासह पहाणी केल्या नंतर येथे बिबट मादी व बछड्याच्या पाऊल खुना त्याना आढळुन आल्या तर ढोमसे ह्या जखमी महिले बरोबर पिंपरीचिंचवड शासकीय रुग्नालयात बिबट प्रतिंबधक लस देण्यासाठी बरोबर गेल्या.

सदर परिसरात वनविभागाने पहाणी करुन पिंजरा लावावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, सरपंच धनंजय बटवाल, माजी सरपंच संतोष कदम, तंटामुक्तचे जिंतेंद्र झगडे, मनोहर बनकर यांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Women injured in junnar due to leopard attack