चिंचवडमध्ये रविवारी रंगणार महिला प्रेरणा संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी - स्वयंसिद्धा प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड शहर) आणि प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 19 ऑगस्ट) चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात येथे एक दिवसीय राज्यस्तरीय महिला प्रेरणा संमेलनाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सचिव किरण मोघे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन प्रतिभा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांच्या हस्ते होणार असून प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

संमेलनाच्या प्रथम सत्रात सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. दुसऱ्या सत्रात अॅड. मनीषा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधानाचे अधिकार व महिला’ या विषयावर परिसंवाद होईल. भोजनोत्तर तिस-या  सत्रात प्रतिभा प्रतिभा महाविद्यालय, प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय, खिंवसरा- पाटील माध्यमिक विद्यालय आणि टीसीएस ग्रुपचे विद्यार्थी कलाविष्कार सादर करतील. संमेलनाच्या अंतिम सत्रात डॉ.पल्लवी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून त्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतील सुमारे छत्तीस कवयित्री सहभागी होतील. संमेलनास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे.

Web Title: Women Inspiration Conference will be held on Sunday in Chinchwad