स्त्रियांनी स्वतःशी स्पर्धा करण्याची गरज - किरवे 

Women need to compete with themselves says harsha kirve
Women need to compete with themselves says harsha kirve

पुणे - 'जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ता या आपल्यासाठी आदर्श होत्या. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील ज्या स्त्रिया शिक्षिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, राजकारणी आहेत त्यांनाही आदर्श मानत असताना आपण स्वतः कोण आहोत हे ओळखून एक-एक पायरी वर जायचे आहे. अस करताना स्वतःशीच स्पर्धा करण्याची गरज आहे,' असे मत ज्ञानप्रबोधिनीच्या सामाजिक कार्यकर्त्या हर्षा किरवे यांनी व्यक्त केले. 

स्व-रुपवर्धिनी तर्फे मकर संक्रमण उत्सवानिमित्त शहराच्या 15 झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकोपा व महिलाशक्तीचा जागर होण्यासाठी, वस्ती भागातील 80 मुलींना घेऊन तयार केलेल्या 'जागर स्त्री शक्तीचा' या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा वेळी किरवे बोलत होत्या. यावेळी स्वरूप वर्धिनीचे कार्याध्यक्ष रामभाऊ डिंबळे, पुष्पा नाडे, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. 

या नाटकामध्ये वस्ती भागातील लहान मुली, तरुणी, महिलांना कोण-कोणत्या पद्धतीच्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी महिला एकजुटीच्या माध्यमातून, तिला धीर देऊन खंबीर बनविण्याचा काम केले जाते. सावित्रीबाई, जिजामाता यांनीही तेच काम केले अशा स्वरूपाचा संदेश या नाटकामधून या मुलींना उपस्थितांना दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com