महिला पोलिसांनी आव्हानांना सामोरे जावे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - शहर पोलिस दलात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण होण्यासाठी महिला म्हणून सवलतींची अपेक्षा करणे सोडावे लागेल. तसेच, महिला पोलिसांनी आत्मविश्‍वासाने आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी व्यक्त केले. 

जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलिस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी "ब्रेकफास्ट विथ सीपी' उपक्रम राबविण्यात आला. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आयुक्‍तांनी महिला पोलिसांशी संवाद साधला. या मेळाव्याला महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होत्या. 

तसेच, पिझम संस्थेच्या वतीने वाहतूक शाखेतील संस्कार हॉलमध्ये ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या संस्थापिका प्रियांका गोडे, नेहा ठक्कर, फैजा पुनावाला, वाहतूक उपायुक्त कल्पना बारवकर, पोलिस निरीक्षक स्वाती थोरात, गीता दोरगे, क्रांती पवार, संगीता जाधव, योगिता कुदळे आदी महिला अधिकारी उपस्थित होत्या.

Web Title: women police Challenges faced