महिला पोलिसाने लहान मुलांना काढले पाण्यातून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुणे : खडकवासला कालव्याला गुरूवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ भगदाड पडल्याने परिसरातील झोपड्यात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने झोपड्यांमध्ये घुसल्याने अनेक लोकांना बाहेर पडणेही मुश्‍किल झाले. अशातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढण्यास मदत केली. गुडघाभर पाण्यातून लहान मुलांना आपल्या पाठीवर बसवून बाहेर काढणाऱ्या महिला पोलिसांनी कुटुंबीयांना मोठा धीर दिला. त्या महिला पोलिसाचे नाव आहे नीलम गायकवाड. त्या एक डॅशिंग महिला पोलिस म्हणून संपूर्ण दत्तवाडी परिसरात परिचित आहेत

दांडेकर पुल परिसरात कालव्याला भगदाड पडल्याने झोपडपट्टीत पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, फायर ब्रिगेड, वाहतूक पोलीस, ऍम्बूलन्सच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर याठिकाणची परिस्थीती पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनेक लहान मुले, ज्येष्ट नागरिक याठिकाणी अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच मदत केली. यात विशेषतः पोलिस दलातील महिला पोलिसांनी आपल्या पाठीवर लहान मुलांना उचलून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.

अनेक ज्येष्ठ महिलांनाही आधार देत बाहेर काढण्यात आले. महिला पोलिस तात्काळ मदतीला धावून आल्याने लहान मुलांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, लांबच लांब लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही मोठी कसरत केल्याचे दिसून आले.

Web Title: Women Police Rescued Children From Water