आरोग्याचा संदेश देत धावल्या महिला

बाणेर - महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ‘पिंकथॉन’च्या वतीने ‘साडी रन’ घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.
बाणेर - महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी ‘पिंकथॉन’च्या वतीने ‘साडी रन’ घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.

पुणे  - महिलांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती, स्तनांचा कर्करोग यासाठी जनजागृती करणाऱ्या ‘पिंकथॉन’च्या वतीने साडी रन आणि कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. 

बाणेर येथील बालेवाडी हाय स्ट्रीटसमोरील टेनिस कोर्टावर नुकताच हा ‘साडी रन’ झाला, तर वेताळ टेकडीवर कॅन्सर ‘शिरो ट्रेक’ घेण्यात आला. या संदर्भात ‘पिंकथॉन’चे संस्थापक मिलिंद सोमण म्हणाले, ‘‘आरोग्याविषयी महिलांमधील दृष्टिकोन बदलणे, त्या अधिकाधिक आपल्या तंदुरुस्तीसाठी कसा पुढाकार घेतील, हाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच साडी रनचे आयोजन केले होते. सुटसुटीत वाटेल अशा पोशाखात व्यायामाची सवय त्यांनी लावून घ्यायला हवी.’’   
कॅन्सर शिरो ट्रेकचे आयोजन युनायटेड सिस्टर्स फाउंडेशनने केले होते. बजाज इलेक्‍ट्रिकल्स पिंकथॉन पुणेने त्यासाठी साह्य केले. कॅन्सरसारख्या शारीरिकरीत्या; तसेच भावनिक पातळीवर उद्‌ध्वस्त करणाऱ्या आजारातून धैर्याने उभ्या राहिलेल्या व्यक्तींना सुरक्षित वातावरणात निर्माण करणे हा त्यामागचा हेतू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com