महिलेचा २ मुलांसह नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

गणेश बोरुडे
मंगळवार, 22 मे 2018

घरगुती वादातून झालेल्या भांडणातून महिलेने आपल्या दोन मुलांसह आंबी पुलावरुन इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने महीला बचावली असली तरी दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा अद्यापही शोध चालू आहे.

तळेगाव स्टेशन - घरगुती वादातून झालेल्या भांडणातून महिलेने आपल्या दोन मुलांसह आंबी पुलावरुन इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने महीला बचावली असली तरी दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा अद्यापही शोध चालू आहे.

तळेगाव एमआयडीसीमधील पुष्पसंवर्धन उद्यानातील एका पॉलिहाऊस कंपनीत कामाला असलेल्या मुळच्या मध्य प्रदेशातील एका दांपत्याचे सोमवारी रात्री जेवण बनविले नाही या कारणावरुन भांडण झाले. त्याचाच राग मनात धरून शकुंतला अवधेश केवट (पॉलिहाऊस, नाणोली, मावळ, पुणे) हिने आज मंगळवारी सकाळी (ता.२२) दहाच्या सुमारास आपल्या दोन्ही मुलांसह आंबी-वराळे पुलावरुन इंद्रायणी नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

महिलेस पुलावरुन नदीत उडी मारताना पाहीलेल्यांनी त्वरित एमआयडीसी पोलिसांना कळवत तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. चार वर्षाच्या अमन अवधेश केवट याचा मृतदेह हाती लागला असून, दिड वर्षाचा छोटा मुलगा अमर अवधेश केवट याचा मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेचा पती अवधेश जगन्नाथ केवट याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील करीत आहेत.

Web Title: women try to suicide