महिलांमुळे दलित चळवळीला ताकद मिळेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मालधक्का - नामदेव ढसाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत मल्लिका ढसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मालधक्का - नामदेव ढसाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत मल्लिका ढसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे - ‘‘महिला केवळ वोट बॅंक नाहीत, तर आपल्या लढ्यातील साथीदार आहेत. त्या लढ्यात उतरल्या तर दलित चळवळीला व शोषणाच्या संघर्षाला अधिक ताकद मिळेल, त्यामुळे महिलांना जगाच्या राजकारणाची ओळख करून द्या व त्यांना रणांगणात आणा,’’ असे आवाहन दलित पॅंथरच्या केंद्रीय अध्यक्षा मल्लिका ढसाळ यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना केले.

दलित पॅंथरचे संस्थापक- अध्यक्ष व कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्या बोलत होत्या. पॅंथरचे उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ, प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्‍याम भोसले, युवकचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम, केंद्रीय संघटक सुभाष लाटकर, कोशाध्यक्ष श्रीकांत लोणारे, राज्य कार्याध्यक्ष अविनाश राऊत, आरती साठे, रमेश पारधे या वेळी उपस्थित होते.

ढसाळ म्हणाल्या, ‘‘घरातील महिलांना मान द्यावा. त्या घरातील सैनिक आहेत. त्या घरात आहेत म्हणून पुरुष मंडळी बाहेर पडून लढू शकतात. अनेक महिलांनी त्याग व संघर्ष करून कुटुंब चालवले आहे. पॅंथरमधून असे नेते निर्माण व्हावेत, जे शासनकर्ते होतील.’’

ढसाळ यांनी या वेळी नामदेव ढसाळ यांच्यावर लिहिलेल्या दोन कवितांचे वाचन केले. 
राऊत म्हणाले, ‘‘सध्या देशात सांविधानिक प्रश्न निर्माण झाला आहे. एनआरसी हे बेकायदा असून त्याला देशभरात विरोध झाला पाहिजे, तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’ डॉ. भोसले म्हणाले, ‘‘दादांचे विचार आजही जिवंत आहेत. मुस्लिम समाजाला धक्का बसला तर दलित समाज शांत बसणार नाही.’’ पडवळ यांनी प्रास्ताविकात पॅंथरची भूमिका स्पष्ट केली. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com