Women's Day 2019 : ध्रुपदगायन अन्‌ विज्ञानाचा साधना संगम

ashlesha shintre
ashlesha shintre

महिला दिन 2019  
आश्‍लेषा शिंत्रे ही तरुणी ध्रुपदगायन व योगाभ्यासाचा मेळ घालून आपले व इतरांचेही जगणे अधिकाधिक सजग होण्यासाठी प्रयत्नशील आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंगचा अमेरिकेतून घेतलेली पदवी, एका कंपनीसाठी तयार केलेले सॉफ्टवेअर, यांतून पक्का झालेला तिचा तार्किक विचारसरणीचा पायाही तेवढाच महत्त्वाचा आहे.

आश्‍लेषा कधी एखाद्या बैठकीत ध्रुपदगायन करताना दिसेल, तर कधी ‘बैठक’ या गटामार्फत वाड्यावस्त्यांमधील एखाद्या शाळेत मुलांना तानपुरा हाताळायला देऊन त्याची माहिती देताना दिसेल. कधी ती योगविद्येचे शिक्षण देता देता संबंधितांना स्वत:च्या मनाच्या व शरीराच्या हालचालींकडे लक्ष केंद्रित करायला लावताना दिसेल. कधी ध्रुपदगायनातील आलापी व योगाभ्यासातील प्राणायाम क्रियेतील साम्य यांच्याबद्दल काही सांगताना दिसेल. एकाच व्यक्तीची किती ही रूपे?  आश्‍लेषा म्हणते, ‘‘भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत कोणत्याही अभ्यासविषयाकडे पाहताना त्यात निरनिराळ्या विषयांचा मिलाफ असतो. संगीत,  इतिहास, गणित, भाषा आदींचा परस्परसंबंध मानला जातो. माझ्यासाठी प्रत्येक विषयाच्या अभ्यास दुसऱ्यासाठी पूरक ठरला. भारतीय अभिजात संगीतातील ख्यालगायन  शिकत होते. नंतर गुरुजी उदय भवाळकर यांचे ध्रुपदगायन ऐकताना त्यांची स्थिरता, तानपुऱ्याची ताकद व आलापीचा प्रभाव पडला. मग त्यांच्याकडे ध्रुपद शिकू लागले. योगसाधना करताना विशिष्ट प्रकारच्या मंत्रजपातील स्वर एकाग्रता वाढवतात. मनाबरोबरच देहात कोठे, काय चालले आहे; याकडे सजगतेने पाहत पुन्हा परत यायला श्वासावरील अवधान महत्त्वाचे ठरते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com