महिलांच्या सशक्‍तीकरणाने देश गतिमान होईल : उइके 

महिलांच्या सशक्‍तीकरणाने देश गतिमान होईल : उइके 

पुणे - ""सहकार भारती'ने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या सशक्‍तीकरणासाठी केलेले कार्य देशाच्या प्रगतीला अधिक गतिमान करणारे आहे. यापुढील काळातही हे काम अविरतपणे सुरू राहील,'' असा विश्‍वास छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उइके यांनी व्यक्‍त केला. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"सहकार भारती'च्या वतीने नागपूर येथील रेशीमबागेत आयोजित केलेल्या राष्ट्रीय महिला अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य, महामंत्री उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एन. ठाकूर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी,  राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताकुमारी (शांताक्‍का), मनीषा कोठेकर, सुधाकर कुलकर्णी, डॉ. व्ही. व्ही. देशपांडे, प्रशांत पारलेवार या वेळी उपस्थित होते. 

अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ""सहकार आणि लघुउद्योग क्षेत्रात "सहकार भारती'च्या माध्यमातून काम केले जात आहे. दुप्पट रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज असून, या संस्थेच्या माध्यमातून हे शक्‍य होणार आहे.'' रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे या वेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com