संगणक साक्षरतेत महिलांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पिंपरी - महिला व मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र (एमएससीआयटी) हा संगणक साक्षर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ७ हजार ८९७ महिला प्रशिक्षणार्थी संगणक साक्षर झाल्या आहेत. 

पिंपरी - महिला व मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र (एमएससीआयटी) हा संगणक साक्षर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ७ हजार ८९७ महिला प्रशिक्षणार्थी संगणक साक्षर झाल्या आहेत. 

माणसाच्या विकासासाठी तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञान हे सातत्याने बदलत आहे, हा बदल तरुणाबरोबर त्याचे पालकही स्वीकारत असून संगणक शिकण्याकडे युवतीबरोबर महिला पालकांचाही सहभाग वाढत आहे. सरकारी नोकरीसाठी एमएस-सीआयटी कोर्स अनिवार्य आहे. यासाठी महिला व बाल कल्याण विभाग, मागासवर्गीय अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत महिलांसह, पुरुष आणि अपंग व्यक्तींनादेखील संगणक प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी खासगी संस्थेत तीन हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते. 

महापालिका मात्र या शुल्काच्या दहा टक्के म्हणजे ३५० रुपये शुल्क घेते. हे प्रशिक्षण महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या नियंत्रणाखाली व महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या परवानगीने सुरू आहे. त्यासोबत संगणक प्रशिक्षक काम करीत आहेत. गतवर्षापासून एमएससीआयटीच्या सहकार्याने ‘टॅली’चे प्रशिक्षण सुरू केले आहे. एका सेंटरमध्ये सुमारे ५०० लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत सेंटरची संख्या वाढवली पाहिजे, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. 

ही आहेत प्रशिक्षण केंद्रे
पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालय 
लांडेवाडी भोसरी माध्यमिक विद्यालय 
माध्यमिक विद्यालय केशवनगर चिंचवड 
कीर्ती विद्यालय निगडी प्राधिकरण 
साईउद्यान, संभाजी नगर

नोकरी, व्यवसायातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संगणकीय ज्ञानाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. जानेवारी महिन्यापासून प्रशिक्षणास सुरवात होते.
- शशिकांत पाटील, प्राचार्य, आयटीआय मोरवाडी 

2013 ते 2017 वर्ष
 लाभधारक    संख्या 
 मागासवर्गीय     १ हजार ९२८ 
 महिला     ७ हजार ८९७ 
 अपंग     १८ 
 एकूण संख्या    ९ हजार ८४३

Web Title: Women's leadership in computer literacy in PCMC