महिलांचे नेतृत्व ‘लिज्जत’ने तयार केले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.

पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, अभिनेत्री अनिता दाते, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, अभिनेते राहुल सोलापूरकर, खासदार वंदना चव्हाण, सचिन इटकर, उषा काकडे, काँग्रेसचे नेते उल्हास पवार, अभय छाजेड आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, की महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे नेहमी बोलले जाते. ते काम ‘लिज्जत पापड’ने केले.  

या वेळी सपकाळ, फुटाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेकडून सपकाळ यांच्या ममता बालसदन संस्थेला तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. स्वाती पराडकर यांनी प्रास्ताविक केले. माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुरेश कोते यांनी आभार व्यक्त केले.

विविध अनुभवांचा सामना करीत या महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याप्रमाणेच मुलीला आणि सुनेलाही घडवावे. 
- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

‘राधिका’ साकारतानाही तुमच्या सर्वांकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी काम करते. त्यातूनच ती प्रमुख बनते.
- अनिता दाते, अभिनेत्री

Web Title: Women's leadership was created by Lijjat papad says sushilkumar shinde