'पाककृती' स्पर्धेत महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

जनार्दन दांडगे
शनिवार, 9 जून 2018

उरुळी कांचन - 'सकाळ' मध्यम समूह व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील 'तेज प्लॅटिनम' सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाककृती' स्पर्धेत महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 

उरुळी कांचन - 'सकाळ' मध्यम समूह व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील 'तेज प्लॅटिनम' सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पाककृती' स्पर्धेत महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. 

तेज प्लॅटिनम सोसायटी येथे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या या स्पर्धेत महिलांनी स्वादिष्ट व वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ बनविले होते. यामध्ये कविता गोरे यांच्या मँगो आईस्क्रीम, चिकन बिर्याणी व पिझ्झा फ्लेवर चिकन रोल याला प्रथम, स्वरा सप्तीस्कर यांच्या सोलकढी, सुरणाची भाजी, आंबोळी व केळ्याचे स्लाईसला द्वितीय तर राणी गाडेकर यांच्या मालवणी चिकन रस्सा, जीरा राईस, सुके चिकन व ज्वारीची भाकरी या पदार्थास तृतीय क्रमांक मिळाला. तसेच उज्वल आहेर यांच्या बटर नान व बटर चिकन, वैशाली खिचडे यांच्या चॉकलेट बिस्कीट व रोल, शमिका जमादार यांच्या हरियाली पनीर टिक्का व चीज पॅलेस रॅप या पदार्थांना अन्रुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. 

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आहार तज्ञ सुजाता नेरुरकर यांनी काम पाहिले. जिल्हा वितरण व्यवस्थापक योगेश निगडे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करून सर्व महिला स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्या खेडेकर, मयुरी बगाडे, अनिता कांचन, पार्वती पवळे, सोनाली बोराडे, योगेश्री घोळे, पल्लवी बडगुजर, सीमा राजपुत, वर्षा भोसले, योगिता टिळेकर, वनमाला भोसले, वैशाली दरेकर, सरिता बडगुजर, प्रीती गोते या महिलांनी देखील नाविन्यपूर्ण व रुचकर पदार्थ बनविले होते. 

दरम्यान 'पाककृती' स्पर्धेसाठी बाळासाहेब कांचन (गडकरी), तेज प्लॅटिनम सोसायटीमधील रहिवासी महेश सोनार, जयंत मेमाणे, वितरण एजंट प्रवीण वेदपाठक, संतोष अम्मणगी, वितरण सहाय्यक शशिकांत जगताप, गणेश चव्हाण व दिपक महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले. 
 

Web Title: Women's spontaneous response in the 'recipes' competition