महिलांच्या गुणांना वाव मिळावा - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

पुणे - ‘‘सध्या महिला सक्षमीकरणाचा मुद्दा सतत ऐरणीवर येत आहे. महिलांना जर सक्षम करायचे असेल, तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. लिज्जतला मिळालेला हा सन्मान सर्व महिलांची मान अभिमानाने ताठ करणारा आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.  

गुजरातच्या महिला व बालविकास विभागातर्फे दिला जाणारा यंदाचा महिला विकास पुरस्कार श्री महिला गृहउद्योजक लिज्जत पापड संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती पराडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. 

या निमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर टिळक बोलत होत्या. त्यांच्या हस्ते पराडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुरेश कोते, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिभा सावंत, लता पुणतांबेकर, विमल कांबळे, रत्नमाला जाधव, कमल कोळगे, मंदाकिनी डाखरे, सुमन दरेकर, चेतन नहार उपस्थित होते.

Web Title: Women's talents earned scope