पेसा अंतर्गत कामांचा व नियोजनाचा आढावा

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 4 मे 2018

'पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या विकास कामांत आर्थिक नियमांची पायमल्ली झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देत' ते पुढे म्हणाले, प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल.

जुन्नर : जुन्नरच्या आदिवासी भागातील गावांचे मूलभूत नागरी सुविधांसाठीचे सर्वेक्षण केले आहे. नागरिकांनी विकास कामांच्या प्राधान्य क्रमाने कामे प्रस्तावित करावीत असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केले. 

आदिवासी भागातील पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध कामांची पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश गाढवे, प्रकल्प कार्यालयाचे निरीक्षक योगेश खंदारे, विस्तार अधिकारी दिनकर खरात, पेसा समन्वयक मधुकर ठोगिरे, ग्रामसेवक एन. बी. निचित, सरपंच,उपसरपंच,सदस्य व नागरिक उपस्थित होते. 
यावेळी सुराळे, आपटाळे व सोमतवाडी आदी गावांमध्ये पेसा अंतर्गत झालेल्या कामांचा व नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला.

'पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या विकास कामांत आर्थिक नियमांची पायमल्ली झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देत' ते पुढे म्हणाले, प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी युवकांसाठी उद्योग व व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल.

सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव बिनचूक पाठवावेत. पेसा निधी खर्च करतांना नियमाचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत असे गैरप्रकार करणारांना पाठीशी न घालता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुष यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Work and planning review under PESA