खोरोची : सकाळ रिलिफ फंडातुन ओढा खोलीकरणास सुरवात

राजकुमार थोरात 
सोमवार, 21 मे 2018

वालचंदनगर : खोरोची (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यामाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. 

नीरा नदीच्या काठावर खोरोची गाव वसलेले आहे. गावाजवळून ओढा वाहत असुन सध्या संपूर्ण ओढ्यामध्ये गाळ साचला असून बाभळीचे साम्राज्य झाले आहे. यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी ओढ्यामधून नदीला वाहून जात असल्याने खोरोची ग्रामस्थांनी ओढा खोलीकरण करण्यासाठी सकाळ रिलिफ फंडातुन मदत करण्याची मागणी केली होती.

या कामासाठी सकाळ माध्यम समुहाने सकाळ रिलिफ फंडातुन दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी सरंपच संजय चव्हाण, दत्तु सवासे, दत्तू फडतरे, सुखदेव निकम, हनुमंत देवकर, निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ, बापू नगरे, राजेंद्र बर्गे, ग्रामसेवक सागर सवासे आदि उपस्थित होते.

"सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेले ओढा खोलीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. गतवर्षी सकाळ रिलीफ फंडातुन दगडवाडी व निरवांगी येथे ओढा खोलीकरण करण्यात आले होते. याचा फायदा या गावांना झाला असून पिण्याच्या, जनावरांच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कमी झाला असल्याचे सांगून सकाळ मुळे गावे पाणीदार होत आहे.

- आमदार दत्तात्रेय भरणे

Web Title: work of canal has started through sakal relief fund