महामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके हौददरम्यानच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, टाटा आणि गुलेरमार्क या दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे.

महामेट्रोची आढावा बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत महापालिका ते स्वारगेट या 11.5 किलोमीटर मार्गातील 5.01 किलोमीटरचा मार्ग भूमिगत असून त्याचे काम लवकर सुरू होणार आहे. भूमिगत कामाची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार याबाबतचा आराखडा संबंधित कंपन्यांनी महामेट्रोकडे सादर केला आहे. या कामासाठी टनेल बोरिंग मशिन वापरण्यात येईल. त्याबरोबर पायरिंग रिंग, ओव्हर हेड क्रेन, लोकोमोटिव्ह, हायड्रा मशिन वापरली जातील. जलद गतीने काम होण्यासाठी महामेट्रोने प्रयत्नशील असून, टनेल बोरिंगच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. 

या बैठकीला महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, भूमिगत मार्गाचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनावणे, जनरल कन्सल्टंट टीमचे प्रकल्प समन्वयक हुकूम सिंग चौधरी आणि संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: The work on Mahamatros underground road will be started soon