वैद्यकीय क्षेत्राबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात...

mohol.jpg
mohol.jpg

औंध : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूनही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांच्या योगदानामुळे पुणे शहरातील मृत्यूदर रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत.सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांनी  जीवावर उदार होऊन अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडलेली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील या सर्वांचे कार्य कौतुकास्पद "असल्याचे गौरवोद्गार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.

'डॉक्टर डे ' निमित्ताने बाणेर बालेवाडी मेडिकोजचे डॉ. राजेश देशपांडे व प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. राकेश नेवे यांच्यावतीने औंध येथील शाश्वत हाॅस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील,स्थानिक नगरसेविका अर्चना मुसळे, प्रभाग नऊच्या नगरसेविका ज्योती कळमकर ,स्वप्नाली सायकर, सहायक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य निरीक्षक जालिंदर चांदगुडे, नितीन लोखंडे यांची उपस्थिती होती.

महापौर ढोरे यांनीही सर्व डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक करत 'सर्वांनी गरीब वस्तीतील तसेच गरजू रुग्णांची सेवा करण्याचे' आवाहन केले.कोरोनाच्या गंभीर प्रसंगी ससून रुग्णालयातील अत्यवस्थ  रुग्णांची सेवा करणा-या  डॉ.अभिजित बलदोटा, डॉ. दिनेश लोखंडे, डॉ. राहुल दोशी, डॉ. कांचन सराफ, डॉ. सुषमा जाधव, डॉ. जितेंन शहा, डॉ.अर्चना डोंगरे (108 ), डॉ. प्रदीप ननवरे, डॉ. पदमनाभ केसकर, डॉ. सागर सुपेकर, डॉ. बबन साळवे, डॉ. संतोष बोरा, डॉ. नितीन झनकर  यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.राजेश देशपांडे यांनी केले तर डाॅ.राकेश नेवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com