अबब... पाट्याच पाट्या चोहीकडे!

डॉ. समीर तांबोली
रविवार, 25 मार्च 2018

पुर्वीच्या पाट्या असताना नवीन पाट्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे एका ठिकाणी दोन किंवा तीन पाट्या आपल्याला दिसल्या तर नवल वाटू देऊ नका! या प्रकाराबाबत विविध राजकिय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पुणे - महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 मध्ये नवीन माहिती फलक पाट्या लावण्याचे काम जोरदारपणे सुरु आहे. सोसायट्यांची नावे, चौकांची नावे असलेल्या पाट्या नव्याने लावण्यात येत आहेत. पुर्वीच्या पाट्या असताना नवीन पाट्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे एका ठिकाणी दोन किंवा तीन पाट्या आपल्याला दिसल्या तर नवल वाटू देऊ नका!

या प्रकाराबाबत विविध राजकिय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. आधीच्या पाट्या असताना नवीन पाट्या लावण्याचा अट्टहास का? काही ठिकाणी स्थलनिर्देशित पाट्यांवर सौजन्य म्हणून नगरसेवकांची नावे लावली आहेत. याचा अर्थ नगरसेवकाच्या वैयक्तीक खर्चातून ही कामे केली जातात का? असा सवाल मनसे शाखाप्रमुख, माहिती अधिकारी कार्यकर्ते अझर सय्यद यांनी केली आहे. 

या कामांकरिता लाखो रुपयांची टेंडर काढली जातात. जनतेचा कररुपी पैसा अशा प्रकारे उधळला जात आहे. याची चौकशी केली जावी, अशी प्रतिक्रिया हडपसर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित घुले पाटील केली आहे. पुर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. पार्टी विथ डिफरन्स भाजपा सत्तेत येऊन देखील या प्रकारांमध्ये बदल झालेला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत माहिती घेण्याकरिता वानवडी क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: The work of new flex boards has been started in Mohandwadi Ward No 26