पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला सहा महिन्यात सुरवातः आढळराव पाटील

सुदाम बिडकर
शनिवार, 31 मार्च 2018

पारगाव (पुणे) : पुणे नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला येत्या सहा महीन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहीती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

पारगाव (पुणे) : पुणे नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला येत्या सहा महीन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहीती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व उद्घाटन आणि गावातील शिवसेना शाखा नामफलकाचा अनावरण खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले, तालुका प्रमुख सुनिल बाणखेले, भाऊसाहेब टाव्हरे, सचिन बांगर, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, शिवाजी राजगुरू, डॉ.नवनाथ टाव्हरे, वसंतराव राक्षे, प्रमोद हिंगे पाटील, अजित चव्हाण, कल्याण हिंगे, ज्ञानेश्वर शिंदे, सोमनाथ टाव्हरे,  वैभव टाव्हरे, रामचंद्र टाव्हरे, गणेश टाव्हरे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खासदार आढळराव पाटील पुढे म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग व्हावा यासाठी 15 वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. सुरवातीच्या काळात असलेले 850 कोटीचे बजेट आता 5340 कोटीवर गेले आहे. येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. टाव्हरेवाडी या गावाने माझ्यावर मी राजकारणात पदार्पण करण्याच्या पुर्वीपासून प्रचंड प्रेम केले असल्याचे सांगत टाव्हरेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामस्थांची एकी व उत्साह पाहुन ते पुढे म्हणाले, येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अशीच एकी व उत्साह दाखवून स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी सुसंस्कारित तसेच अभ्यासू लोकांना निवडून देऊन गावचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवहान त्यांनी केले.

एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले...
येणाऱया काही दिवसात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहे, त्यामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील अवसरी बुद्रुक, पारगाव, लोणी व टाव्हरेवाडी या महत्वांच्या गावांचा समावेश आहे. खासदार आढळराव पाटील यांनी एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे.

Web Title: The work of the Pune-Nashik railway line started six months: aadhalrao patil