‘आरटीओ’त बैठकीमुळे कामाचा खोळंबा

‘आरटीओ’त बैठकीमुळे कामाचा खोळंबा

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी भेट दिली. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास ‘आरटीओ’तील कामकाज  ठप्प होते. 

कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून गेल्याने विविध कामांसाठी आलेले नागरिक सुमारे दीड तास काउंटरसमोर ताटकळत थांबले होते. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारादरम्यान हा प्रकार घडला. परवाना काढणे, त्यांचे नूतनीकरण करणे, कर भरणा, आरसी बुक, विमा काढणे अशा विविध कामासाठी दररोज हजारो नागरिक ‘आरटीओ’मध्ये येत असतात. मात्र, आयुक्त चन्ने यांनी  अधिकारी-कर्मचारी यांची अचानक बैठक घेतल्याने नागरिकांना त्यांच्या कामासाठी ताटकळत थांबावे लागले. चन्ने सकाळीच ‘आरटीओ’त दाखल झाले होते. कामकाजाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अकराच्या सुमारास बैठक बोलाविली होती.  

सुटी काढून किंवा कामावर असताना वेळ काढून नागरिक ‘आरटीओ’त त्यांची कामे करण्यासाठी येतात. मात्र, कोणतीही पूर्व कल्पना न देता अशा प्रकारची बैठक आयोजित केल्याने आम्हाला सुमारे दीड तास रांगेत थांबावे लागले, अशी माहिती नौदलातील माजी अधिकारी संजय साळवी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com