गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्ता दुरुस्थी कामाचा प्रारंभ

संतोष आटोळे
रविवार, 29 जुलै 2018

शिर्सुफळ  : गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्थीच्या प्रतिक्षेत असलेल्या बारामती तालुक्यातील गाडीखेल ते कटफळ स्टेशन रस्त्याच्या साडेचार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

गाडीखेल येथील ग्रामस्थ दैनंदिन कोणत्या ना कोणत्या कारणाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या बारामती तसेच एमआयडीसीकडे जात असतात. यासाठी त्यांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे सह्याद्री अँग्रो, कटफळ स्टेशन मार्ग एमआयडी, बारामती मात्र गेल्या अनेक वर्षापासुन गाडीखेलपासुन दोनशे मीटर अंतरावर असलेला तीव्र चढ याची झालेली दुरावस्था तसेत कटफळ स्टेशन पर्यत रस्त्याच्या सर्वत्र उखडलेली खडी यामुळे ग्रामस्थांची तसेच प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती. याचा परिणाम ग्रामस्थांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागत होता .यामुळे वेळ, पैसा व श्रम व्यर्थ जात होते. यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी होत होती.

 या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गाडीखेल ते कटफळ स्टेशन मार्गासाठी 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला. या कामाच्या शुभारंभाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेडगे साहेब, बारामती तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रविण आटोळे, कटफळ सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आटोळे, माणिक आवदे, भाजपाचे गाडीखेल अध्यक्ष अजिनाथ आटोळे, बबन आटोळे, मोहन पोमणे, गोरख आवदे, ठेकेदार अनिल देशमुख, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Web Title: work of road repair start from gadikhel road to katfal road