झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामाला सुरूवात

रमेश मोरे
शनिवार, 23 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभागातील रस्त्यावरील झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामास महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडुन सुरूवात करण्यात आली आहे. गेली चार पाच वर्षापुर्वी रोप व झाडांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या झाडे मोठी झाल्याने परिसरातील अनेक झाडे लोखंडी जाळ्यात अडकली होती. काही झाडात या लोखंडी जाळ्या झाडांनी सामावुन घेतल्याचे चित्र परिसरातुन दिसत होते.पर्यावरण प्रेमी नागरीकांकडुन याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सकाळ मधुन याबाबत सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर सकाळ मधुन या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता.

बातमीची दखल घेत जुनी सांगवी प्रभागाबरोबरच दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळेगुरव या परिसरातील झाडांना अडथळा ठरणाऱ्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. जुनी सांगवीतील मधुबन मित्र मंडळाने मधुबन परिसरातील अडथळा ठरणा-या जाळ्या काढण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

परिसरातील झाडांना अडथळा ठरणा-या लोखंडी जाळ्या काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रभागातील सर्वठिकाणच्या जाळ्या काढण्यास सांगितले आहे.
- हर्षल ढोरे- नगरसेवक प्रभाग क्रं.३२

जुनी सांगवी प्रभागाबरोबच दापोडी,कासारवाडी,फुगेवाडी,पिंपळे गुरव आदी भागात जाळ्या काढण्याचे काम सुरू केले आहे.आठ दिवसात दहा दिवसात काम पुर्ण होईल.
- संतोष लांडगे- उद्यान सहाय्यक "ह" प्रभाग

Web Title: work start to remove metal net of trees