टीबीएम करणार पुण्याची भुयारी मेट्रो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

- पुण्यातील भुयारी मेट्रोचा बोगदा खोदण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स वापरण्यात येणार आहेत

- टनेल बोरींग मशिनचा (टीबीएम) यासाठी वापर केला जाणार 

पुणे : पुण्यातील भुयारी मेट्रोचा बोगदा खोदण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स वापरण्यात येणार आहेत. टनेल बोरींग मशिनचा (टीबीएम) यासाठी वापर केला जाणार आहे. या मशिनमध्ये अतिप्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

या मशिनची लांबी सुमारे 100 मीटर असून, एकाचवेळी सुमारे सहा फूट व्यासाचा बोगदा खोदला जाऊ शकतो. सप्टेंबर अखेरीस ही मशिन चीनमधून पुण्यात पोचणार आहे. ऑक्टोबरपासून शिवाजीनगर आणि स्वारगेटपासून मेट्रोसाठी भुयार खोदण्याचे काम सुरू होणार आहे. या मशिनची चाचणी चीनमध्ये  आज (शुक्रवार) झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work of subway for Pune Metro with the help of TBM