दिव्यांगांना आधार देण्याचे काम करा: डॉ. नसिमादिदी हुरजूक

Dr. Nasimadidi Hoorajuk
Dr. Nasimadidi Hoorajuk

घोडेगाव (पुणे): "आमच्याकडे काही नसताना हे कार्य उभं करू शकलो आहे. आपणही दिव्यांगांना आधार देऊन काम करा. अतिशय गरीब, गरजू, निराधार दिव्यांग मुलांना आमची स्वप्ननगरी संस्था स्वीकारते, असे कोणी असतील तर पाठवा,'' असे आवाहन समाजसेविका डॉ. नसिमादिदी हुरजूक यांनी केले. तसेच, "स्वप्ननगरी' या आपल्या संस्थेची, "सुख दु:खाचे घास दे, तरी पचवायची शक्ती दे, पराभवाचे घाव झेपता, हसवायची युक्ती दे,' ही कविता म्हणत जगण्याची कला शिकवली.

पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे पांडुरंग महाराज येवले यांनी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून शारदा मातेचे मंदिर उभारले आहे. मंदिराच्या उभारणीपासून वसंत पंचमीला या मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. या श्रीशारदा महोत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींना दरवर्षी मॉं भगवत शारदा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार समाजसेविका डॉ. नसिमादिदी हुरजूक यांना देण्यात आला. हा पुरस्कार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या.
 
या वेळी पांडुरंग महाराज येवले, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी सभापती कैलासबुवा काळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाष मोरमारे, वेदमूर्ती मधुकरशास्त्री गवांदे, उपसभापती नंदकुमार सोनावले, जयसिंगकाका काळे, गणेशदादा कोकणे, प्रकाश घोलप, गोविंद खिल्लारी, मोहन कोळपकर, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, ज्योती घोडेकर, दीपाली जाधव आदी उपस्थित होते.
 
या वेळी वळसे पाटील म्हणाले, "दिव्यांसाठी स्वप्ननगरी संस्थेने काम करून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. दीनदुबळ्यांना मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. समाजसेविका डॉ. नसिमादिदी हुरजूक यांचे कार्य अतुलनीय आहे. याचा सर्वच लोकांनी आदर्श घ्यावा. शहरातील अपंगांची परिस्थिती बरी आहे. मात्र, देशात सर्वांत जास्त अपंग खेडेगावात आहेत, त्यांचे जीवनमान अतिशय खडतर सुरू आहे. ग्रामीण भागातील अपंगांना सन्मानाची वागणूक द्या.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com