वाघोली ते बकोरी रस्त्याचे काम पोलिस बंदोबस्तात अखेर सुरू

wagholi
wagholi

वाघोली - जागा मालकाने अडविलेले वाघोली ते बकोरी दरम्यानचे 400 मीटर लांबी असलेले रस्त्याचे काम नाट्यमय घडामोडीनंतर पोलिस बंदोबस्तात अखेर सुरू झाले. दुसऱ्या मतदार संघातील एका आमदाराच्या दबावामुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ऐन वेळी घेतलेली कोलांटीउडी. दुसरी कडे आजच काम सुरू करण्याबाबतची जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके व नागरिकांची ठाम भूमिका. आपल्यावर नागरिकांचा रोष येईल यासाठी स्थानिक आमदाराने अधिकाऱ्यांना काम सुरू करून घेण्याबाबत दिलेल्या सूचना. आशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काम सुरू झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्यांच्या घोषणा नागरिकांनी दिल्या.

वाघोली ते बकोरी दरम्यान दोन किलोमीटर लांबीचे काम दोन वर्षांपूर्वी खाजगीकरणातून सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्याया रोड साठी जिल्हा परिषदेनेही ना हरकत प्रमाणपत्र दिले. मात्र निओ सिटीच्या पुढे 400 मीटर हे काम स्थानिक जागा मालकाने अडविले. ते सुरू करण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. मात्र ते सुरू करता आले नाही. हे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कायदेविषयक सल्लाही घेण्यात आला. जिल्हा परिषदेने पोलीस अधीक्षकांना बंदोबस्त मागितला. आज हे काम सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व सोसायटी धारक जमले. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची सगळे वाट पाहत होते. मात्र त्यांनी ऐनवेळी त्यांनी कोलांटीउडी घेतली. दोन दिवस थांबण्याचे आदेश असून जागा मालकांशी चर्चा करण्याची एका आमदारांची सूचना असल्याचे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी मोबाईल वरून बोलताना सांगितले. जिल्हा परिषद सदस्य कटके यांनी आजच काम सुरू करण्याची ठाम भूमिका घेतली. बकोरीतील काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदारांना नागरिकांच्या रोषाची कल्पना दिली. अखेर आमदारांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना तेथे उपस्तीत राहून काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. कटके यांची ठाम भूमिका व आमदारांच्या सूचना यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्तीत झाले. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या उपस्तीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर तेथे नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सोसायटी धारकांनी गणपती बाप्पा मोर्यांच्या घोषणा दिल्या.

ज्या चारशे मीटर परिसरात काम अडविण्यात आले होते तेथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तेथून चालणेही मुश्किल होते. पावसाळ्यात तर गुढघाभर चिखलातून नागरिकांना जावे लागत होते. त्यामुळे त्या परिसरातील नागरिक खूप त्रस्त झाले होते. दोन वर्षांपासून ते हा त्रास सहन करीत होते. यामुळे अनेकांचे अपघात झाले. आज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर सोसायटी धारकांच्या चेहेऱ्यावर हसू खुलले.

 अधिकारी उपस्तीत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य कटके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पासून सर्व अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. वरिष्ठ अधिकार्यांनी तर मुंबईला असून उद्या बघू असा मेसेज टाकून दिला. काहींनी दोन दिवस थांबण्याची सूचना असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव याना याबाबत माहिती दिली. आढळराव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांचा कॉल त्यांनी घेतलाच नाही.

दुसऱ्या मतदार संघातील एका आमदाराने यामध्ये केलेल्या हस्तक्षेपाबाबत  नागरिक व सोसायटी धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आधी रस्त्याची परिस्तिथी बघायची होती  अशी अपेक्षा व्यक्त केली.

ज्या परिसरात रस्ता अडविण्यात आला. त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सोसाट्या आहेत. या रस्त्याच्या कामामुळे हजारो सोसायटी धारकांना दिलासा मिळणार आहे.

स्थानिक जागा मालकांनी या विरोधात त्वरित न्यायालयात धाव घेतली. आमच्यावर अन्याय असून आता आम्ही न्यायालयातच दाद मागू असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com