काम सोडलेल्या कामगारानेच केली हॉटेलमध्ये चोरी 

4thief_13.jpg
4thief_13.jpg

पुणे : हॉटेलमधील काम सोडलेल्या कामगारानेच रोख रक्कम व पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पहाटे घडली. 

याप्रकरणी सौरभ रॉय (वय 23, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आदिनारायण यादव (वय 31, रा. बी.टी.कवडे रस्ता, घोरपडी गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रोड परिसरात ममाज नावाचे हॉटेल आहे. आदीनारायण हा त्यांच्या हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र काही महिन्यांपुर्वी त्याने फिर्यादी यांच्या हॉटेलमधील काम सोडले होते. दरम्यान, फिर्यादी शनिवारी रात्री काम उरकल्यानंतर हॉटेल बंद करुन घरी गेले. त्यानंतर हॉटेलच्या सीमाभिंतीवरुन उडी मारून आरोपीने हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलच्या गल्ल्यामध्ये साठलेली 90 हजार रुपयांची रोख रक्कम व तीस हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज त्याने चोरुन नेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com