पुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

हडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरेमळा येथे उघडकीस आली.

याप्रकरणी आरोपी फरारी असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. 
संपतसिंग माणिकलाल ( वय ५२ रा, दिंडोरी, मध्यप्रदेश ) असे मृत मजुराचे नाव आहे. तर मंगलसिंग मोहा यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतसिंग व मंगलसिंग मोया हे दोघे पूर्वी विजापूर येथे कामाला होते. दोघेही रेल्वे कंत्रात्रदाराकडे कामाला होते. विजापूर येथे असताना दोघांमध्ये पार्टी देण्यावरून भांडणे झाली होती. दोन दिवसापूर्वी फुरसुंगी येथे ते कामाला आले होते. तेथे आल्यावर देखील दोघांमध्ये भांडणे झाली. त्याचा राग मनात धरून मंगलसिग याने संपतसिंगच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने संपतसिंगचा मृत्यू झाला. पुढील तपास हमराज कुंभार करीत आहेत. 
 
Web Title: Worker murder his colleague for not giving a new year party in pune