Loksabha 2019 : रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार : जानकर.

रमेश वत्रे
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे : ''बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. 

पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. 

ते म्हणाले, ''खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव आपण करू शकतो. हा विश्वास रासपने भाजपमध्ये निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपने बारामतीत यंदा ताकद लावली आहे.  रासप गेली अनेक वर्ष या मतदार संघातील तण छाटायचे काम करीत आहे. आता जमीन सुपीक झाली असून कमळ फुलणार आहे. दगडाला धडका मारायचे काम महादेव जानकरने केले आहे. पवारांना विरोध करताना बहुजन समाजाला भीती वाटायची. ही भीती रासपच्या सैनिकांनी घालवली आहे. मतदारांनी मतदान करताना मनाला प्रश्न विचारावा की सुळे यांनी खासदार म्हणून आपल्या तालुक्याला दिले.  

 जानकर म्हणाले, ''बारामतीमध्ये कमळ चिन्हावर मिळणारी उमेदवारी मीच नाकारली. त्यामुळे कार्य़कर्त्यांनी नाराज होऊ नये. भाजप मला कधी कधी दाबते परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमचे अस्तित्व मानायला तयार नाहीत. मुख्यमंत्री माझ्या अनेक गोष्टी ऐकत असतात. त्यामुळे मला त्यांचे ऐकावे लागते. शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आश्वासन दिल्याने ते नेते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आहेत. मात्र काँग्रेसचे कार्य़कर्ते आपल्या नेत्यांची अवहेलना कदापी विसरू शकत नाहीत. त्यामुळे ते आतून कांचन कुल यांना मत देतील.'', असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे.  

आरक्षणाचे 60 टक्के काम पुर्ण
राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुर्ण अनुकुल असल्याने आऱक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत आदीवाशी समाजाला मिळणाऱ्या अन्य सर्व सवलती दिल्या आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. हा मोठा निर्णय़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आरक्षणाचे 60 टक्के काम पुर्ण झाले असले तरी आम्ही त्यासाठीचा पाठपुरावा सोडलेला नाही. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव दिले आहे.   
 

Web Title: Workers of Mahayuti and RSP will help for BJP's victory