esakal | सेवानिवृत्तीवेळी झालेल्या सन्मानाने माळेगावचे कामगार भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

malegoan

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामधील ऊस विकास, इंजिनिअरिंग, सुरक्षा विभागासह विविध खात्यातील 35 कामगार आज सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीवेळी झालेल्या सन्मानाने माळेगावचे कामगार भावूक

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : ज्या कारखान्यात आयुष्याच्या उमेदीच्या काळात घाम गाळून आपल्या संसाराची उभारणी केली, तसेच कारखानाही भरभराटीला आणला... तेथील प्रशासनाने सेवानिवृत्तीवेळी स्मृतीचिन्ह, फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान केला. या आगळ्यावेगळ्या सत्काराने कामगारही भावूक झाले.  

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामधील ऊस विकास, इंजिनिअरिंग, सुरक्षा विभागासह विविध खात्यातील 35 कामगार आज सेवानिवृत्त झाले. संबंधित कामगारांचा कारखान्याच्या प्रशासकिय कार्य़ालयात सन्मान करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक राजेंद्र ढवाण, योगेश जगताप, अनिल तावरे, सुरेश खलाटे, संजय काटे, स्वप्नील जगताप, प्रताप आटोळे, संजय जाधव, विजय वाबळे आदी उपस्थित होते. कामगार नेते सुरेश देवकाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन शेखर जगताप यांनी केले, तर आभार ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी मानले. 

ण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या वेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्रामध्ये माळेगाव साखर कारखाना अग्रगण्य समजला जातो. या कारखान्याच्या वैभवशाली जडणघडणीत आजी- माजी पदाधिकाऱ्यांबरोबर कामगारांचाही वाटा अधिकचा आहे. त्यामुळे अनेक वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या सेवानिवृत्त साखर कामगारांना सन्मानपूर्वक घरी पाठविणे कारखाना प्रशासनाचे कर्तव्य आहे. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

सेवानिवृत्त कामगारांची नावे पुढीलप्रमाणे : बाळकृष्ण जाधव (वाचमन), हनुमंत देवकाते (पेंटर), किशोर गोफणे (क्लार्क), चांदमोहंमद शेख , विश्वास बर्गे, विश्वास तावरे, महादेव खलाटे, काशिनाथ देवकाते, माणिक जाधव, मारूती चोपडे, गजानन जगताप, दिनकार तावरे, दादा जगताप (सर्व मजदूर), शिवाजी शिंदे (चालक), रमेश सस्ते, रामचंद्र एजगर, प्रकाश तावरे, दिलीप ढवाण (सर्व हेल्पर), धनंजय पाटील (लॅब इन्चार्ज), दत्तात्रेय डोंबाळे (वाॅटर अटेंडट), मारूती दळवी, विलास पेटकर, शिवाजी सस्ते (तिघे फिटर), अशोक ढवाण (आॅइलमन), रमेश येळे (शिपाई), सुभेदार जाधव (पंपमन), ज्ञानदेव तावरे (अॅग्री असिस्टन), धनसिंग कोळेकर, दिलीप चव्हाण (चिटबाॅय), मानिक तावरे (पॅनमन), शहाजी कांबळे (वाॅचमन), हिंदुराव देवकाते (फायरमन), रमेश लोंढे (वेल्डर), पार्वती जाधव (स्वच्छता विभाग).