सरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले.

पुणे जिल्हा एमआयडीसी, महिला, शेतकरी, असंघटित, कष्टकरी, अंगणवाडी, बालवाडी महिला कर्मचारी संघटनेचा महामेळावा आज बारामतीत झाला. त्याचे उद्घाटन करताना पवार बोलत होते. कामगार नेते भालचंद्र कांगो अध्यक्षस्थानी होते. 

शरद पवार म्हणाले, निवडणूक आली की काहीतरी सांगून सत्ता मिळवायची व पुढची पाच वर्षे समाजाकडे पाहायचेच नाही, कष्टकरी व कामगारांच्या घामाला किंमत द्यायची नाही, शेतकरीही वैतागून आत्महत्या करीत आहेत. अशा स्थितीत कामगारांच्या नव्हे तर मालकांच्या बाजूने सरकार शक्ती उभी करत आहे. हे दुर्देवी आहे. सरकारच्या कामगारविरोधी भूमिकेमुळे एकीकडे बेरोजगारी वाढत आहे तर दुसरीकडे सरकार रोजगारनिर्मितीतही अपयशी ठरले आहे. शेतकरी कर्जमाफीबाबतही सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले, तरीही सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा समाजाच्या सर्वच घटकांच्या विरोधातील सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे,  असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

भालचंद्र कांगो यांनी 'सब का साथ, सब का विकास' असे नसून एक हात अडाणी व एक हात अंबानींच्या खांद्यावर ठेवणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात हाक दिली. 'मोदी हटाव देश बचाव' असे कामगारांचे धोरण असून, मोदींविरोधातील पक्षांना आगामी निवडणूकीत आम्ही साथ देऊ, असे सांगितले. या देशात सत्तापरिवर्तनात कामगारांची जबाबदारी मोठी असून 55 कोटी कामगारांनी ठरवलं तर काहीही बदल ते करु शकतात, असे सांगत सरकारला इशारा दिला.

तानाजी खराडे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश सांगितला. तुकाराम चौधर, शांतीकुमार माने, अशोक इंगळे, रामभाऊ रसाळ, सुनील शेलार, तानाजी वायसे, सचिन नवसारे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. माधव रोहम, व्ही.व्ही. कदम, विठ्ठल मणीयार, महंमद शफीक संकेश्वरकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers should unite to pull down the government says Sharad Pawar