Lockdown : ...त्यांच्या खेळाचा झाला "खेळ"

Lockdown :  ...त्यांच्या खेळाचा झाला "खेळ"

पिंपरी : "आम्हांला इथे राहायचे नाही, आमच्या गावी परत जायचयं, खेळ थांबल्याने हातात पैसा नाही. खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने जगायचे तरी कसे? असे सांगताहेत लॉकडाऊनमध्ये अडकलेले डिस्नी लॅन्डचे ३५ परप्रांतीय कामगार. काळेवाडीत दोन महिन्यापासून अडकून पडलेल्या या कामगारांची कमाई गेल्याने शहरवासियांसमोर हात पसरून जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यातून सुटका कशी करायची? या पेचात असताना वाढविलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 

शहरवासीयांसाठी खेळ, खाऊ आणि भरपूर खरेदी असे मनोरंजनासाठी छोटेखानी व्यावसायिक दरवर्षी शहरात येत असतात. असेच हे व्यावसायिक खेळाच्या साहित्यासह काळेवाडी - आदर्शनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यात दाखल झाले. दोन महिन्यापासून मोकळ्या मैदानात तंबू ठोकून ते राहत होते. दीड महिन्याचा खेळ करून परत ते उत्तर प्रदेशला परतणार होते. सुरवातीच्या महिन्यात ३० हजार कमाई झाली, पण अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सगळी कमाई संपून गेली.

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद

आधीच हातावर पोट असलेली ही माणसं. त्यांचे मालक हैद्राबादमध्ये अडकून पडला आहे. संचारबंदीमुळे त्यांना  बाहेर पडता येईना आणि या गडबडीत, या कामगारांच्या परतीच्या प्रवासाचा मेळ बसेना. आर्थिक गणित  बिघडले आहे. अशा अडचणीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मुंबई या ठिकाणावरून आलेले ३५ कामगार सापडले आहेत

Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही

 शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय आणि लॉकडाऊन पण वाढवण्यात आला आहे. खेळ बंद असल्याने परक्या शहरात जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  परप्रांतीय कामगारांना आधार देण्यासाठी काही दात्यांनी मदत केली. मात्र, ती मर्यादित ठरली. आम्हावर सध्या उपासमारीची वेळ आल्याचे सांगताना सौरभ कुमारच्या डोळ्यात पाणी तरारले. त्यासाठी सामाजिक सस्था, दात्यांनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे  आहे.

पाळणा व्यावसायिक दिनेश ओझा म्हणाले ,  "पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आम्ही उघड्यावरच राहत असून उन्हाचे चटके सोसत आहोत, जे मिळेल ते खाऊन पोट भरत आहोत. अशा काळात कुठ जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे हे मोठे संकट आमच्यावर ओढवले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com