सकाळ रिलिफ फंडातुन ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम पूर्ण

राजकुमार थोरात
सोमवार, 2 जुलै 2018

वालचंदनगर (पुणे) : लाखेवाडी (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातुन ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले असुन आेढ्यामध्ये पावसाचे पाणी साचले अाहे. ओढ्यातील पाण्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लाखेवाडीमध्ये सकाळ रिलिफ फंड व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी ओढाखोलीकरणासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिली होती.

२२४४ मीटर लांबी, ८.८ मीटर रुंदी व १.९३ खोलीमध्ये  ओढाखोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नुकत्याच गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे ओढ्यामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी ओढ्यातील जमीनीमध्ये मुरले आहे. चालू वर्षी होणाऱ्या पावसाळ्यामध्ये जास्तीजास्त पाणी ओढ्यामध्ये मुरणार असुन यामुळे लाखेवाडीमध्ये गावातील जलस्त्रोत बळकट होण्यास मोलाची मदत होणार आहे. ओढ्यामध्ये ३ कोटी ८१ लाख लिटर पाणी साठा होणार आहे.

सकाळने आेढाखोलीकरण केल्यामुळे लाखेवाडी गावातील व परीसरातील पिण्याच्या पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उन्हाळ्यामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे.काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश डोंगरे यांनी मदत केली.

सकाळचे आभार...
लाखेवाडी गावच्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचा प्रश्‍न अनेक दिवसापासुन प्रलंबित होता. सकाळ माध्यम समुहाने, सकाळ रिलीफ फंडातुन  गावामध्ये ओढाखोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे गावातील परीसरातील जलस्त्रोत बळकट होण्यास मदत होणार असून आम्ही ग्रामस्‍थांच्या वतीने सकाळ माध्यम समुहाचे आभार  मानत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व सरपंच  साेमनाथ गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: works complete of water storage with the help of sakal relief fund