एमआयटीमध्ये बिझनेस जर्नालिझम' विषयावर कार्यशाळा

जनार्दन दांडगे
शनिवार, 14 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकास्टींग जर्नालिझम विभागातर्फे 'बिझनेस जर्नालिझम' कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे यंदाचे दुसरे वर्ष असून यावेळी वरीष्ठ पत्रकार प्रत्युष भास्कर, गीता नायर, कौस्तुभ कुलकर्णी, आयएसबीजेच्या अधिष्ठाता आसावरी भावे, आयएसबीजेचे संचालक कुष्णमुर्ती ठाकुर उपस्थित होते.

यावेळी प्रत्युष भास्कर म्हणाले,"सध्या बिझनेस जर्नालिझम क्षेत्रातील बातमीदारी ही फार उथळपणाने केली जात आहे. त्यामुळे क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी प्रथम बिझनेस ही संकल्पना समजून घ्यावी व पत्रकारीतेत येणाऱ्या नवीन पिढीने मार्केटच्या गरजांनुसार बातमीदार व्हावे. बिझनेस पत्रकारीता ही आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्राशी जोडली गेलेली संकल्पना आहे. या क्षेत्रात पत्रकारीता करताना तुमच्याकडे सबळ पुरावे आणि तुमचा माहितीचा साठा असावा लागतो." आर्थिक घडामोडीचा प्रत्येक देशाच्या अर्थकारणावर परिणाम होत असतो. त्यामुळे बिझनेस संदर्भात बातमी करताना दोन्ही बाजूने विचार करून बातमी द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गीता नायर म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात बिझनेस वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या बाजूला काय सुरू आहे, याचे अभ्यास करावे. आपल्या आवडीच्या विषयात आपली पकड असावी. स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी स्पर्धेनुसार विचार करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान आयएसबीजेच्या अधिष्ठाता आसावरी भावे, आयएसबीजेचे संचालक कुष्णमुर्ती ठाकुर यांनीही आपेल विचार व्यक्त केले.

Web Title: workshop on business journalism in mit