जुनी सांगवीत शाडुमातीच्या पर्यावरणपुरक गणेशमुर्ती तयार करण्याची कार्यशाळा

रमेश मोरे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग व इसिए संस्था यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पुरक शाडु मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा पालिकेच्या जुनी सांगवी मुले क्र.४९ शाळेत संपन्न झाली. शाडु माती मुर्तीचे काम, कला आणि कलाकारांचे कौतुक या उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यात शाडू माती मूर्ती बनविण्याचे शाळा शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  मुर्तीकामाचे प्रशिक्षण देवुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पर्यावरणपुरक गणेश उत्सव साजरा करावा, असे इसिए संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले. 

कार्यशाळेची सुरूवात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षण विभाग सदस्या शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, ईनर व्हील क्लबच्या माधुरी गोडबोले, वंदना जैन, मुर्ती प्रशिक्षक विश्वास फडणवीस, इसिए अध्यक्ष विकास पाटील, प्रभाकर मेरूकर, दत्तात्रय कुमठेकर, सुभाष चव्हाण, हिरेन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सांगवी व परिसरातील पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, व्हि.ए.एन.ईंग्लीश स्कुल, पिंपळे सौदागर प्रा.शाळा कासारवाडी सह परिसरातील २६ शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींनी कार्यशाळेत सहभाग नोंदवुन प्रशिक्षण घेतले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेहाना आत्तार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोहिणी जोशी यांनी केले. तर कार्यशाळेचे संचलन पर्यवेक्षिका सुजाता खणसे, स्वाती पवार, वैशाली देशमुख, कुमुदिनी मदने, सुरेखा निंबाळकर, साहिराबानु शेख, अरूणा टेकवडे यांनी केले. पिं.चि.महापालिकेच्या शिक्षण विभाग सदस्या तथा नगरसेविका शारदा सोनवणे यांनी कार्यशाळेत शाडु माती पासुन गणेश मुर्ती बनविण्यासाठी प्रशिणार्थी बनुन प्रशिक्षण घेतले.

Web Title: Workshop for preparing Ganesh Murti