भाषांच्या भिंती ओलांडताना व्यंग्यचित्र बोलके - फडणीस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - ""चित्रातून बोलता यायला हवं. कारण शब्द वाचायची सवय असते. मात्र चित्रही वाचता येते. विचारांना व्यक्त करणारे हे प्रभावी माध्यम होय. म्हणूनच भाषांच्या भिंती ओलांडताना व्यंग्यचित्रही बोलके ठरते,'' असे मत ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले. 

कार्टूनिस्ट कम्बाइन आणि भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यातून जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सनईवादकाचे व्यंग्यचित्र रेखाटून फडणीस यांनी कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, चारुहास पंडित उपस्थित होते. घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यंग्यचित्रकारांनी त्यांची कला सादर केली. 

राजकीय-सामाजिक व्यंग्यचित्रे, अर्कचित्रे, फिगर ड्रॉइंग आदी विषय या निमित्ताने हाताळण्यात आले. फडणीस म्हणाले, ""अमेरिकेत पाच मे रोजी व्यंग्यचित्रकार दिनाचा जन्म झाला. चित्र ही निखळ आनंद देणारी कला आणि मनोरंजनात्मक माध्यम आहे.'' गोगावले म्हणाले, ""समाजजीवनातील विविध घटकांमध्ये स्नेह जपण्याची भाजपची कार्यपद्धती आहे. व्यंग्यचित्रकलेची जोपासना पुण्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण शहरात होत असल्याचा आनंद आहे. अशा कलांना विकसित करण्याचाच भाजपचा प्रयत्न राहील.'' 

Web Title: World Cartoonist Day