esakal | जगास युद्ध नको तर बुद्ध हवा, डॉ. आंबेडकर यांचे विचार हवेत : दिलीप सरोदे
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय बौद्ध महासभेची बैठक

जगास युद्ध नको तर बुद्ध हवा, डॉ. आंबेडकर यांचे विचार हवेत: दिलीप सरोदे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : महात्मा गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाने स्वीकारले असून युद्ध नको पण बुद्ध हवेत अशी जगाची भूमिका आहे. त्यामुळे दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व आचरण होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान देणे गरजचे आहे असे प्रतिपादन महासभेचे महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव दिलीप सरोदे यांनी केले.

हेही वाचा: किरीट सोमय्यांचा बारामती दौरा; जाणून घ्या त्यामागचं कारण

डाॅ. आंबेडकरनगर मधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभेची बैठक दिलीप सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महासभेचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष रघुनाथ साळवे, पुणे जिल्हा पूर्व सरचिटणीस राजरतन थोरात,कोषाध्यक्ष व इंदापूर तालुका पालकमंत्री ॲड. सुधाकर सरदार उपस्थित होते.

हेही वाचा: पाच रुपयांत मनपा पीएमपीएलची बस सेवा

प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर पुर्वीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली मात्र कोरोना महामारीत चांगले काम केल्याने इंदापूर तालुका अध्यक्ष डाॅ. जीवन सरवदे, तालुका सरचिटणीस प्रा. श्रीनिवास शिंदे, तालुका कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, शहराध्यक्ष सुधीर मखरे व कार्य कारिणीची फेरनिवड करण्यात आली.यावेळी बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांची इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून एकमेव निवड करण्यात आली.

हेही वाचा: साधना सहकारी बँकेच्या इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे,तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघ कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री अशोक मखरे, प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोक मखरे, प्रा.नवनाथ चंदनशिवे, प्रा. तानाजी कसबे, प्रा.संजय बल्लाळ, राजेंद्र चव्हाण, मागास वर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, सुनिल मखरे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, रविंद्र चव्हाण, विनय मखरे, दादासाहेब किर्ते, अनिल साबळे, आनंद मखरे, प्रा. मयूर मखरे यांच्यासह तालुक्यातील सर्व श्रामनेर, बौध्दाचार्य,केंद्रीय शिक्षक, विद्यमान तसेच इच्छुक पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top